अधिवक्ता इरशाद अलीने हिंदु असल्याचे भासवून हिंदु युवतीशी केला विवाह !
आता राजधानी देहलीत लव्ह जिहादची घटना उघड !
|
देहली – येथील ज्योतीनगर भागातील पोलिसांनी लव्ह जिहादच्या एका प्रकरणामध्ये इरशाद अली नावाच्या एका अधिवक्त्याला अटक केली. आरोपी इरशाद अली याने तो हिंदु असल्याचे सांगून त्याच्याकडे वकिली कामाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो मुसलमान असल्याचे समोर आल्यावर तो तिच्यावर धर्मांतर, तसेच नमाज पढण्यासाठी दबाव आणून तिला मारहाण करत असे.
१. वर्ष २०११ मध्ये आरोपी इरशाद अली याच्याकडे वकिली कामाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या हिंदु युवतीला त्याने स्वत:चे नाव गुड्डू चौधरी असल्याचे सांगितले होते. पीडितेला यावर विश्वास बसावा म्हणून त्याने त्याच्या हातावर दुर्गादेवीचा ‘टॅटू’ही गोंदवून घेतला होता.
२. पुढे दोघांमध्ये प्रेम होऊन वर्ष २०१५ मध्ये त्यांनी विवाह केला. कालांतराने गुड्डू हा मुसलमान असून त्याचे नाव इरशाद अली आहे आणि त्याचा आधीपासून विवाह झाला असून त्याला मुले आहेत, हे पीडितेला कळाले. त्यानंतर ईरशाद याने तिला अनेक वेळा मारहाणही केली.
In Delhi now; Irshad Ali, a murder accused posed as Guddu Choudhary to rape a woman in Jyoti Nagar area in Delhi. pic.twitter.com/5LGLCiVeSR
— Subhi Vishwakarma (@subhi_karma) September 10, 2022
३. तिने पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तिच्या झालेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्या शरिरावर २८ ठिकाणी जखमा झाल्याचे, तसेच मारहाणीमुळे तिच्या पायाचे हाड मोडल्याचे समोर आले.
संपादकीय भूमिका
|