व्यायाम प्रशिक्षकाने बलात्कार केल्यावरून तेलुगु चित्रपट अभिनेत्रीची पोलिसात तक्रार
प्रशिक्षकाला अटक
मुंबई – एका तेलुगु चित्रपट अभिनेत्रीने आदित्य कपूर नावाच्या व्यायाम प्रशिक्षकाच्या (‘जिम ट्रेनर’च्या) विरोधात अनेक वेळा बलात्कार केल्याचा, तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून कपूर याला अटक केली.
मुंबईच्या कफ परेड पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेल्या तक्रारीत २४ वर्षीय अभिनेत्रीने म्हटले, ‘ऑगस्ट २०२१ मध्ये माझी आणि आदित्य कपूरशी प्रथम भेट झाली. पुढे कपूरने माझ्याशी विवाह करण्याचे आश्वासन देऊन माझ्यासमवेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मधल्या काळात कपूरने मला मारहाण केली, तसेच ‘मी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर माझी अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित करीन’, अशी धमकी दिली, तसेच मला जिवे मारण्याची धमकीही दिली.’ शेवटी अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगून पोलिसात तक्रार प्रविष्ट केली.