अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मारहाण करणार्या नराधमावर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई करा ! – विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन
आरोपीचे वकीलपत्र न घेण्याची अधिवक्त्यांकडे मागणी
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – १० सप्टेंबर या दिवशी चंदूर येथे ॠतिक माणिक शिंदे या नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगड आणि उसाचा बुडका यांनी मारहाण केली. या प्रकरणी ॠतिक याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई करावी, तसेच त्याला हद्दपार करावे या मागणीचे निवेदन विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक, तसेच ‘इचलकरंजी बार असोसिएशन’ यांना देण्यात आले.
या वेळी पू. संतोष उपाख्य बाळ महाराज, सर्वश्री पंढरीनाथ ठाणेकर, किशोर मोदी, संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, जितेंद्र मस्कर, मारुति शिंगाडे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ‘आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.