सनातनच्या वाढत्या कार्यात बांधकाम क्षेत्रातील सेवांसाठी स्थापत्य अभियंत्यांची आवश्यकता !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सत्सेवेची अमूल्य संधी !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या ध्येयाने प्रेरित होणार्‍या साधकांची संख्या वाढत आहे. साधकांची वाढती संख्या पहाता सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूच्या निर्मितीसाठी स्थापत्य अभियंत्यांची (‘सिव्हिल इंजिनीयर’ची) आवश्यकता आहे. या सेवेद्वारे धर्मकार्यात योगदान देण्याची अमूल्य संधी आहे. ही सेवा करतांना स्थापत्य अभियंत्यांसाठी पुढील सेवा आहेत.

१. वास्तूविशारदाने (‘आर्किटेक्ट’ने) केलेल्या नकाशाप्रमाणे आणि त्याने अंतिम केलेल्या इमारतीच्या संदर्भातील सूचीप्रमाणे (‘स्पेसिफिकेशन’नुसार) ‘कॉन्ट्रॅक्टर’कडून (ठेकेदाराकडून) दर्जात्मक काम करून घेणे

२. बांधकाम नियोजनानुसार आणि वेळेत पूर्ण करून घेणे

३. नियोजनाप्रमाणे कामाच्या प्रगतीचा आढावा (प्रोग्रेस रिपोर्ट) प्रकल्प व्यवस्थापकास (‘प्रोजेक्ट मॅनेजर’ला) देणे

४. बिले तपासणे इत्यादी सेवा आहेत.

वरील सेवांचे कौशल्य किंवा अनुभव असणारे, तसेच नुकतेच नवीन ‘डिप्लोमा सिव्हिल’ किंवा ‘डिग्री’ प्राप्त झालेले आणि ही सेवा करण्यास इच्छुक असलेले साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वतःची माहिती पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : 

सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, पिन – ४०३४०१