शिवाजी विद्यापिठाच्या पेपरफुटी आणि परीक्षा निकालातील गोंधळाविषयी अभाविपचा कुलसचिवांना घेराव !
कोल्हापूर – शिवाजी विद्यापिठाच्या पेपरफुटी आणि परीक्षा निकालातील गोंधळाविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलसचिवांना घेराव घालून त्याविषयी जाब विचारला. या प्रसंगी अभाविपचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, ‘‘पेपरफुटीप्रकरणी दोषी असणार्यांवर कारवाई कधी करणार ? परीक्षा नियंत्रक हे निष्क्रिय असून त्यांना परीक्षा विभागाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौकशी समिती नेमून समितीचा निर्णय येईपर्यंत त्यांना विद्यापिठाच्या कामकाजापासून दूर ठेवावे; अन्यथा अभाविप यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.’’ (विद्यार्थ्यांना येणार्या समस्यांची विद्यापीठ प्रशासन नोंद का घेत नाही ? विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)
या वेळी कोल्हापूर महानगरमंत्री दिग्विजय गरड, माधुरी लड्डा, अमोघ कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, गौरव ससे, सानिका पाटील, गणेश डुबल, पराग कुलकर्णी यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.