नियमितपणे सत्संग ऐकल्यामुळे केरळ येथील सौ. नीना उदयकुमार यांना आलेल्या अनुभूती
१. यजमानांसह बाहेर जाण्यासाठी निघत असतांनाच यजमानांना तातडीने कामासाठी जावे लागणे आणि ते घरी येईपर्यंत मनात प्रतिक्रिया न येता २ घंटे आनंदाने नामजप होणे
एकदा आम्हाला (मला आणि यजमानांना) एकत्र बाहेर जायचे होते. त्यासाठी मी कार्यालयातून सुटी घेतली होती. माझे यजमान रिक्शाचालक आहेत. आम्ही बाहेर जाण्यासाठी निघणार, तेवढ्यात माझ्या यजमानांना कुणाचा तरी भ्रमणभाष आला. त्या व्यक्तीला तातडीने रिक्शेची आवश्यकता होती. यजमानांना त्या व्यक्तीला रिक्शातून घेऊन जावे लागले. यजमान २ घंट्यांनी घरी आले. त्या कालावधीत माझ्या मनात कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. मी आनंदात होते. मी २ घंटे आनंदाने नामजप केला. मी सत्संग नियमितपणे ऐकत असल्याने प्रतिदिन चांगल्या गोष्टी माझ्या कानावर पडतात. त्याचाच हा परिणाम आहे.’
२. पूजेसाठी सफरचंद विकत घेऊन पिशवीत ठेवत असतांना ‘देव जवळ असून एकेक फळ देवासमोर ठेवत आहे’, असे जाणवणे
‘एकदा मला पूजेसाठी फळे विकत घ्यायची होती. मी दुकानात जाऊन सफरचंदे विकत घेतली आणि एकेक सफरचंद पिशवीत ठेवू लागले. त्या वेळी मला जाणवले, ‘देव माझ्या जवळच आहे आणि मी एकेक सफरचंद त्याच्या समोर ठेवत आहे.’ तेव्हा मला वाटले, ‘मी सत्संग ऐकत असल्याने मला ही अनुभूती आली.’
– सौ. नीना उदयकुमार, केरळ (१४.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |