हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्राद्धादी क्रियाकर्मांत घुसलेले अपप्रकार !
‘जेव्हा एखाद्या परिवारातील वयस्कर व्यक्ती मृत्यू पावते. त्यानंतर केल्या जाणार्या विविध अंत्यविधी क्रिया-कर्मांची एक लांबलचक सूची (मालिका) असते, ज्याचे पालन प्रत्येक परिवारातील सदस्यांना करणे शक्य होत नसते. असे जरी मानले की, मृताच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी हे धार्मिक विधी आणि क्रिया-कर्म करायला पाहिजेत; परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यावर मानसिक दबाव आणून क्रियाकर्माच्या नावाखाली एवढा अनावश्यक खर्च केलाच पाहिजे की, तो व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर कर्जाच्या ओझ्याने जिवंतपणी मृतवत झाल्यासारखा जगावा.
ग्रामीण क्षेत्रांमध्ये जेथे संपूर्ण भावकी एकत्र (नातलग) असतात, तेथे तर परिवाराची स्थिती आणखीच दयनीय होते. मृताच्या परिवारातील लोक मृतात्म्याच्या शांतीसाठी हिंदु संस्कारांच्या नियमानुसार पवित्र गंगेमध्ये जेव्हा अस्थिविसर्जन करून परत येतात, तेव्हा तर त्यांच्याकडून बळजोरीने गंगा प्रसादी आणि बारावा-तेरावा याचे (गाव) भोजन देण्यास सांगितले जाते. जर मृत व्यक्तीच्या परिवाराने आपल्या ऐपतीप्रमाणे आणि दयनीय आर्थिक स्थितीमुळे ब्राह्मण किंवा परिवारातील सर्व सदस्यांना ‘मृत्युभोज’ देण्यात थोडी जरी हेळसांड केल्याचे समजले, तरी त्यांना जात-नातेवाईकांमधून वाळीत टाकले जाण्याची धमकी (धौंस) त्यांच्याच परिवाराचे पंच देतात. बस ! लोकलज्जा आणि समाजाचे टोमणे टळावेत यांसाठी रूढीवादी परिवार आणि इच्छा नसतांना क्रियाकर्मे करण्यास आरंभ केला जातो.
मृताच्या जवळच्या नातेवाइकांना महागडे कपडे-लत्ते सुद्धा देण्याची परंपरा असते. नाईलाजास्तव काही जण उधार घेऊन किंवा दागिने गहाण ठेवून पैसे जमवतात आणि संपूर्ण क्रियाकर्म करवून घेतात म्हणजे, त्यांच्या परिवाराकडे कुणी बोट दाखवणार नाहीत.
वास्तविक अशा संस्कारांची परंपरा अन्य धर्मियांमध्ये सुद्धा आहे; परंतु हिंदु परिवारांमध्ये या रूढी (प्रथा) आजसुद्धा अनाचारासारख्या पसरत चालल्या आहेत, ज्याच्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही. हा विषय टीका करण्याचा नसून आम्हाला यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे !’
संदर्भ : मासिक ‘संस्कारम्’, मार्च-२०१७
(हिंदु धर्मशास्त्रावर श्रद्धा ठेवून करतो, ते ‘श्राद्ध’ ! श्राद्ध केल्याचे अनंत लाभ असले, तरी त्यामध्ये ज्या चुकीच्या चालीरिती घुसल्या आहेत, त्यांना विरोध होणेही तितकेच आवश्यक आहे. या लेखातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे अपरिहार्य का आहे, हे लक्षात आले असेल ! – संपादक)