मथुरा येथील श्री. भूपेश शर्मा यांनी धर्मप्रसाराची सेवा करतांना समाजाच्या मनातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी अनुभवलेला आदरभाव !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे अनेक धर्मप्रेमींनी ‘साधना हाच जीवनाचा मुख्य आधार आहे’, हे समजून घेऊन साधना करण्यास आरंभ केला आहे, तसेच त्या धर्मप्रेमींनी त्यांच्याशी जोडलेले कुटुंबांतील सदस्य आणि त्यांचे मित्र इत्यादींनाही साधना सांगितली आहे.
२. आता ३ – ४ धर्मप्रेमी सेवेतही सहभागी होत आहेत. त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला आरंभ केला असून त्यांचे चांगले प्रयत्न होत आहेत.
३. मागील काही वर्षांमध्ये आपल्याशी जोडल्या गेलेल्या ‘प्रोफाईल’ सदस्यांनी (हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंनी) धर्मकार्यात सहभागी होण्यास आरंभ केला आहे. त्या समवेत त्यांनी साधनेचे प्रयत्नही चालू केले आहेत.
४. आता समितीच्या कार्याचा समाजातील लोकांना आधार वाटतो. त्यांना धर्माशी संबंधित एखादा प्रश्न किंवा शंका आली, तर ते त्वरित मला विचारतात.
५. अनेक धर्मप्रेमी आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडित प्रसंगांविषयीही मला आध्यात्मिक दृष्टीकोन विचारतात.
६. अन्य संघटनांशी जोडलेल्या समाजातील लोकांनाही ‘हिंदु राष्ट्रा’च्या कार्याप्रती पुष्कळ आदर वाटतो. ते मला म्हणतात, ‘‘तुम्ही आमच्याकडे कार्यशाळा घ्या.’’
‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच समाजातील विविध लोकांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रती श्रद्धा आणि भाव निर्माण होत आहे’, असे माझ्या लक्षात आले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. भूपेश शर्मा, मथुरा, उत्तरप्रदेश. (२२.६.२०२२)