जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन संमत

हरिद्वार येथील धर्मसंसदेत कथित चिथावणीखोर भाषण केल्याचे प्रकरण !

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

नवी देहली – हरिद्वार येथे धर्मसंसदेत कथित चिथावणीखोर भाषण केल्याच्या प्रकरणी जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन संमत केला आहे. जितेंद्र त्यागी यांच्यावर हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत इस्लाम आणि पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जितेंद्र त्यागी यांना सर्वोच्च न्यायालयाने ३ मासांसाठी अटींसह जामीन संमत केला होता.

काही मासांपूर्वी वसीम रिझवी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला होता. त्यानंतर संपूर्ण देशात त्यांच्या धर्मांतराची चर्चा चालू झाली होती. हरिद्वार येथे धर्मसंसदेत त्यांनी कथित चिथावणीखोर भाषण केल्यामुळे त्यांच्याविषयीचा विरोध आणखी वाढला होता. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.