हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांत प्रवचन, सामूहिक नामजप या माध्यमांतून धर्मप्रसार !
कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांत श्री गणेशोत्सव धर्मशास्त्रानुसार कसा साजरा करावा ?, याविषयी प्रवचन, श्री गणेशाचा सामूहिक नामजप, अथर्वशीर्ष पठण या माध्यमांतून धर्मप्रसार करण्यात आला. अनेक मंडळांनी विषय आवडल्याचे सांगून बहुतांश सर्वच ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांना परत प्रबोधन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
१. इचलकरंजी साजणी येथील मंडळामध्ये प्रवचन, सामूहिक नामजप आणि अथर्वशीर्ष पठण घेण्यात आले. याचा लाभ पुष्कळ जिज्ञासूंनी घेतला. येथे धर्मशिक्षणवर्गाची मागणी असून पुढील सणांचे नियोजनही करण्यात आले आहे.
२. इचलकरंजी येथील कोरोची गावात धर्मवीर प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीने सामूहिक नामजप आणि दुर्वा वहाण्याचा उपक्रम घेण्यात आला.
३. मलकापूर येथील ‘शिव शाहू कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ’ येथे गणेशोत्सवाविषयी माहिती देण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येत महिला-पुरुष उपस्थित होते. मलकापूर येथील ‘नरहर तरुण मंडळा’त झालेल्या प्रवचनाचा लाभ जिज्ञासूंनी घेतला.
४. कोडोली येथील छावा तरुण मंडळात ‘गणेश उपासना आणि संस्कृती रक्षण’ या विषयावर झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी घेतला.
५. कुडित्रे (राधानगरी) येथील शिवतेज गणेशोत्सव मंडळात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी घेतला. येथील दत्त प्रसाद मंडळात श्री गणेश उपासना, संस्कृतीरक्षण आणि धर्मशिक्षण या विषयावर झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांनी घेतला. येथे मार्गदर्शन संपल्यावर काही महिला आल्याने आयोजकांच्या विनंतीनुसार परत एकदा ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर झालेल्या मार्गदर्शनासाठी पुष्कळ जिज्ञासू उपस्थित होते. याच्या नियोजनात शिरोली येथील धर्मप्रेमी श्री. संदीप चौगुले यांनी पुढाकार घेतला.
६. बेलेवाडी (तालुका – आजरा) येथे श्री. दिग्विजय चव्हाण यांनी ‘शौर्य जागृती’ या विषयावर व्याख्यान घेतले. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. येथे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या संदर्भातील माहिती देणारे ‘फ्लेक्स’ प्रदर्शन लावण्यात आले होते.
७. शेळकेवाडी येथील मंडळात ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी घेतला.
८. जत्राट येथील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ येथे झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांनी घेतला. येथे श्री गणेशाचा नामजप घेण्यात आला. या प्रसंगी अनेकांनी ‘नामजप केल्यावर चांगल्या अनुभूती आल्या’, असे सांगितले.
विशेष
१. हसुर बुद्रक येथे मंडळात झालेल्या मार्गदर्शनाचा लाभ १८० जिज्ञासूंनी घेतला. येथे स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्याविषयी माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. येथे श्री गणेशाचा सामूहिक नामजप घेण्यात आला.
२. उंचगाव येथे ६ गणेशोत्सव मंडळांना ‘हलाल जिहाद’चा विषय सांगून त्या संदर्भातील निवेदनावर अध्यक्ष, कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
३. साजणी या गावात ‘अष्टविनायक तरुण मंडळ’ येथे भुयेवाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी सौ. गायत्री पाटील यांच्या पुढाकाराने, तसेच श्री. वरुण पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध पाटील यांच्या सहकार्याने प्रवचन घेण्यात आले. श्री. अनिरुद्ध पाटील यांनी ‘यापुढील काळातही असे कार्यक्रम आयोजित करू’, असे सांगितले.