श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी पन्हाळगड येथील ‘लंडन बस’ या नावाची पाटी हटवली !
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), १२ सप्टेंबर (वार्ता.) – श्री शिवछत्रपती पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले असतांना सिद्धी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा पुरवणारे इंग्रज होते; मात्र त्यांच्याच नावाने पन्हाळगडावर फिरणार्या एका गाडीला ‘लंडन बस’ अशा नावाची पाटी लावली होती.
हे नाव पालटून चांगले ऐतिहासिक नाव द्यावे, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी गेल्या ४ मासांपासून मागणी करत होते. गाडीमालकाने अनेक वेळा आश्वासने देऊनही ते पाळले नाही. अखेर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनीच पुढाकार घेऊन पन्हाळगड येथील इंग्रजी नाव असणारी ‘लंडन बस’ अशा नावाची पाटी काढून टाकली. (भारत स्वतंत्र झाला, तरी वैचारिकदृष्ट्या आपण पारतंत्र्यातच आहोत, हे दर्शवणारी ही घटना आहे ! इंग्रजी नावाची पाटी आहे, हे लक्षात येऊन ते काढण्यासाठीचा पाठपुरावा करणार्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांचे अभिनंदन ! – संपादक)