खारघर येथे शाळेच्या बसला आग !
कुणालाही दुखापत नाही
नवी मुंबई – खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्या शाळेच्या बसला आग लागली. आग लागण्यापूर्वीच चालकाने सर्व विद्यार्थ्यांना बसमधून उतरवल्याने सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. सीबीडी बेलापूर येथील ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळे’ची बस खारघरहून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. बोनेटमधून जळल्याच्या वास आला आणि धूर निघाला. त्याच वेळी प्रसंगावधान राखत बसचालक आणि साहाय्यक यांनी त्वरित सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. पनवेल अग्नीशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.