गोवंडी येथील शासकीय वसतीगृहातून ६ मुलींचे पलायन !
मुंबई – गोवंडी येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहातील स्वच्छतागृहाची खिडकी आणि गज तोडून ११ सप्टेंबर या दिवशी पहाटे ६ मुली पळून गेल्या. विविध अन्वेषण यंत्रणांकडून मानवी तस्करीच्या गुन्ह्यात सोडवलेल्या, तसेच भीक मागण्याच्या कामातून सोडवलेल्या अल्पवयीन मुली या वसतीगृहात ठेवण्यात आल्या आहेत. या मुलींनी पळून जाण्यापूर्वी सुरक्षारक्षकाच्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली होती. वसतीगृहातील मुलींची उपस्थिती घेतली असता काही मुली अल्प असल्याचे अधिकार्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअशी कुचकामी सुरक्षायंत्रणा काय कामाची ? |