विद्यार्थ्याला दारू पाजून पँटमध्ये लघवी करण्याची बळजोरी करणार्या ४ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद !
कामोठे (नवी मुंबई) येथील एम्.जी.एम्. दंतमहाविद्यालयातील धक्कादायक प्रकार !
कामोठे (नवी मुंबई) – येथील एम्.जी.एम्. दंतमहाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांनी मिळून एका कनिष्ठ विद्यार्थ्याचा छळ (रँगिंग) केला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. महाविद्यालयाने प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार चौघांनी १९ वर्षीय विद्यार्थ्याला प्रथम दारू प्यायला लावून नंतर स्वत:च्याच विजारीत (पँटमध्ये) लघवी करण्याची बळजोरी केली. (विकृतपणाची परिसीमा ! – संपादक) महाविद्यालयाने चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. वरील प्रकार जुलै २०२२ मध्ये घडला; पण विद्यार्थ्याने याविषयी कुणालाच सांगितले नाही. नुकताच त्याने हा प्रकार पालकांना सांगितला.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे छळ करणारी ही भावी पिढी देशाचे भविष्य उज्ज्वल कसे करणार ? |