धर्मांधाने तरुणीला पळवून नेऊन मौलानाच्या घरी बळजोरीने विवाह केला !
|
(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)
अमरावती – धारणी येथील एका तरुणीला प्रेमप्रकरणातून पळवून नेऊन भाग्यनगर येथे मौलानाच्या घरी बळजोरीने तिचा विवाह लावण्यात आला. पीडित तरुणीनेच असा आरोप केला आहे. पोलिसांच्या साहाय्याने तिला धारणी येथे परत आणण्यात आले.
१. मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून भाग्यनगर येथे नेले. ‘विवाह केल्यानंतर मला इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले. गोमांस खाण्यासाठीही बळजोरी केली जात होती’, असे सर्व आरोप तिने केले आहेत.
२. शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून तरुणीने स्वतःच्या आईला संपर्क केला. त्यानंतर नातेवाइकांनी तिची सुटका करून तिला घरी आणले.
३. तिला पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती; मात्र धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला, असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. (आता श्री. बोंडे यांनीच अशा कर्तव्यचुकार पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’च्या आणखी अशा किती घटना झाल्यावर सरकार याविरोधात कारवाई करणार आहे ? |