पाकिस्तानच्या पराभवाने नाराज झालेल्या पाक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षाने भारतीय पत्रकाराचा भ्रमणभाष हिसकावला !
दुबई – श्रीलंकाने रविवार ११ सप्टेंबर या दिवशी दुबई येथे ‘आशिया कप २०२२’ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्याने पाकिस्तानचे विजेता होण्याचे स्वप्न भंगले. पाकिस्तानच्या पराभवाने नाराज झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका भारतीय पत्रकाराचा भ्रमणभाष हिसकावतांना दिसत आहेत. पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजा यांनी मैदानाच्या बाहेर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी भारतीय पत्रकार रोहित जुगलन यांनी त्यांना, ‘या पराभवामुळे अत्यंत दु:खी असलेल्या पाकिस्तानी लोकांसाठी तुम्ही काय संदेश देणार का ?’ यावर रमीझ राजा म्हणाले, ‘‘तुम्ही भारतीय आहात. त्यामुळे तुम्हाला पाकिस्तानचा पराभव झाल्याचा पुष्कळ आनंद होईल.’’ असे म्हणत त्यांनी पत्रकाराचा भ्रमणभाष हिसकावून घेतला. तसेच त्यांना दूर जाण्यास सांगितले.
सौजन्य स्पोर्ट्स यारी
संपादकीय भूमिकापाकिस्तान्यांमध्ये भारताविषयीचा द्वेष नसानसांत भरला आहे आणि तो व्यक्त करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत, हेच यातून दिसून येते ! |