नवी मुंबईत कृत्रिम तलावांपेक्षा नैसर्गिक जलस्रोतांत श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास प्राधान्य !
नवी मुंबई – अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरातील विविध नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांमध्ये ९ सहस्र ९६ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यांपैकी ५ सहस्र २७९ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये करण्यात आले. कृत्रिम तलावांपेक्षा पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी प्राधान्य दिले. एकूण ८ सहस्र ६०८ घरगुती आणि ४८८ सार्वजनिक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये पारंपरिक २२ मुख्य विसर्जन स्थळांवर ४ सहस्र ८३२ घरगुती, तसेच ४५७ सार्वजनिक अशा ५ सहस्र २७९ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
निर्माल्यावर खतनिर्मिती प्रक्रिया करणार !
नवी मुंबई महापालिकेचा धर्मद्रोह !
सर्वच विसर्जनस्थळी ओले आणि सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते. निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ४० टनांहून अधिक जमा झालेल्या ओल्या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्र खतनिर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे. हे खत शहरातील उद्यानांमध्ये टाकण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली.
संपादकीय भूमिकाधर्मशास्त्रानुसार निर्माल्याचे वहात्या पाण्यात विसर्जन करणेच श्रेयस्कर आहे ! |