आफताब उपाख्य ‘पुष्पेंद्र’ने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

  • उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादचे नवे प्रकरण उजेडात !

  • मूल झाल्यानंतर मुहर्रमच्या दिवशी सत्य आले उजेडात !

  • आरोपी आफताब फरार !

मिर्जापूर (उत्तरप्रदेश) – राज्यातील मिर्जापूर जिल्ह्यात लव्ह जिहादचे नवे प्रकरण समोर आले आहे. येथील आफताब अंसारी याने स्वत: ‘पुष्पेंद्र’ असल्याचे सांगून पूजा सिंह नावाच्या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला. विवाहाच्या ३ वर्षांनी आफताबपासून मुलगी झालेल्या पूजाला पुष्पेंद्र हा मुसलमान असल्याचे समजले. याविरोधात पीडितेने आफताब आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. पूजा ही मूळची उत्तरप्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील असून आफताब त्यांच्या घराशेजारी असलेल्या औषधांच्या दुकानात कामाला होता. त्याने तो पुष्पेंद्र असल्याचे खोटे सांगून पूजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि पुढे विवाह केला. मूळचा झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील रहिवासी असलेला आफताब आणि पूजा मिर्जापूर जिल्ह्यातील लालगंज येथे राहू लागले.

२. कालांतराने पूजाला मूल झाले. त्यानंतर एकदा दोघेही झारखंडमध्ये आफताबच्या गावी आले असता घरी मुहर्रम साजरा करत असल्याचे पाहून तो मुसलमान असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांमध्ये पुष्कळ वाद होऊ लागले. काही दिवसांनी आफताब तिला सोडून पळून गेला.

३. पूजा तिच्या बाळाला घेऊन आफताबच्या गढवा जिल्ह्यातील गावी गेली. तेथे त्याच्या कुटुंबियांनी तिला मारहाण करत बाहेर काढले. गढवा पोलिसांकडे न्यायाची मागणी करण्यासाठी गेलेल्या पूजाला त्यांनी उत्तरप्रदेश पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देऊन स्वतःचे हात झटकले. (झारखंडमध्ये हिंदुद्वेष्ट्या झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असतांना त्यांच्या पोलिसांकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? – संपादक) त्यानंतर पूजाने मिर्जापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादच्या समस्येवर आता केवळ कठोर कायदा करून नव्हे, तर पकडण्यात आलेल्या मुसलमान आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक ! मुळात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र हिंदूंच्या मुळावर उठल्याने ‘पकडण्यात आलेल्या धर्मांध मुसलमानांना फाशीची शिक्षा द्या’, अशी कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?
  • हिंदु युवती आणि महिला यांना सतर्कता बाळगण्यासमवेतच धर्मशिक्षण आणि साधना यांचे धडे देणे आवश्यक !