सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण
सोनभद्र – उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यामध्ये सर्फराज नावाच्या मुसलमान तरुणाने एका १५ वर्षांच्या हिंदु मुलीला फूस लावून तिचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर सर्फराज याने तिच्यावर इस्लाम स्वीकारून विवाह करण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी पोलिसांनी सर्फराज याला अटक केली आहे.
ही घटना सोनभद्र जिल्ह्यातील पन्नूगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडरी कला गावातील आहे. येथे पीडित मुलगी तिच्या आजोबांच्या घरी रहात होती. पीडित मुलीच्या मामाचा मित्र सर्फराज हा त्यांच्या घरी यायचा. त्याने पीडित मुलीला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही सर्फराज याने पीडित मुलीच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कुठल्याही दबावाला न जुमानता पन्नूगंज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. सर्फराज याने पीडित मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.