‘सेक्युलर’ (निधर्मी) देशात हिंदूंच्या उत्सवांसाठी मुसलमानांच्या अनुमतीची आवश्यकता काय ? – गायत्री एन्., संस्थापिका, ‘भारत व्हॉईस’
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘गणेशोत्सव : मुसलमान समाजाची अनुमती का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुंबई – मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी सरकारी आणि सार्वजनिक जागा अडवून प्रशासनाला रहदारीचा मार्ग बंद करण्यास भाग पाडले जाते. असे असतांना कोईंबतूरमध्ये श्री गणेश उत्सवासाठी मुसलमानांची अनुमती का घ्यावी लागते ? हे तर थेट भारतीय लोकशाही आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर केलेले आक्रमण आहे. असे चालू राहिले, तर भारत लवकरच ‘दार-उल्-इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) होईल. ‘भारत ‘सेक्युलर’ देश असतांना हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी मुसलमानांच्या अनुमतीची आवश्यकताच काय ? मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्या उत्सवासाठी कधी हिंदूंची अनुमती घेतात का ?’, असा परखड प्रश्न ‘भारत व्हॉईस’च्या संस्थापिका गायत्री एन्. यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘गणेशोत्सव : मुसलमान समाजाची अनुमती का ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ संवादात त्या बोलत होत्या.
हिंदूंनी स्वत:च्या धर्मावर होणार्या अन्यायाच्या विरोधात जागे होणे आवश्यक ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक
हिंदूंची भूमी असतांना त्यावर हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हुब्बळ्ळी येथे मुसलमानांकडून तीव्र विरोध केला जात आहे. बेंगळुरूमध्येही हाच प्रकार चालू आहे. हुब्बळ्ळी येथील मैदानात राष्ट्रध्वज फडकावण्यासही मुसलमानांचा तीव्र विरोध आहे. पूर्वी तेथे राष्ट्रध्वज फडकावण्याच्या वादावरून झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला होता. वर्षातून केवळ २ वेळा नमाजपठण करण्यासाठी हिंदु मठाने मुसलमानांना अनुमती दिली असतांनाही असे प्रयत्न म्हणजे हुब्बळ्ळीची जागाच हडपण्याचा हा ‘लँड जिहाद’ आहे. हिंदूंच्या जागेवर हिंदूंच्या उत्सवाला विरोध करणार्यांनी ‘गंगा-जमुनी तहजिब’ (गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) सांगणे निरर्थक आहे. हिंदूंनी स्वत:च्या धर्मावर होणार्या अन्यायाच्या विरोधात आता जागे होण्याची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारने वक्फ कायदा रहित करावा ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
देशभरात श्रीरामनवमी, हिंदु नववर्ष यात्रा, नवरात्री आदी सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक करत जाळपोळ करण्यात येते. यात हिंदूंच्या हत्याही झाल्या. वर्षातून २ वेळा नमाजपठण केले जाते; म्हणून कर्नाटकातील हुब्बळ्ळी मैदान हिंदूंना गणेशोत्सव साजरे करण्यासाठी दिले जात नाही. त्यावर मुसलमान आणि वक्फ मंडळ दावा करत आहे. उद्या रस्त्यावर नमाजपठण केले; म्हणून तो रस्ताही वक्फची संपत्ती असल्याचा दावा मुसलमान करतील. वर्ष २०१३ मध्ये वक्फ कायद्यात काँग्रेसच्या तत्कालीन मनमोहन सिंह सरकारने दिलेल्या पाशवी अधिकारामुळे देशभरात वक्फ मंडळ साडेसहा लाख एकरहून अधिक भूमीचे मालक झाले आहे. या बेकायदेशीर कायद्यामुळे देशच त्यांच्या नियंत्रणात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा रहित केला पाहिजे.