(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हा अपराध नाही का ?’
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उधळली मुक्ताफळे !
अमरावती – येथील रुक्मिणीनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा शोध लागला. ‘ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेली होती’, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्वीटद्वारे म्हटले आहे, ‘दूरभाष ध्वनीमुद्रित करण्याचे ‘अॅप’ ठेवायचे नाही, असा पोलिसांचा नियम आहे का ? यावर प्रकाश टाकावा अन्यथा पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करावे. ‘लव्ह जिहाद’ नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हा अपराध नाही का ? मग कारवाई का होत नाही ?’
लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का?; सचिन सावंतांचा सवाल @sachin_inc @Dev_Fadnavis @BJP4India @navneetravirana #freepressindia https://t.co/W2FW57u9mS
— 𝐅𝐑𝐄𝐄 𝐏𝐑𝐄𝐒𝐒 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 (@Freepressindia1) September 9, 2022
ही हिंदु तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी राजापेठ येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती. या प्रकरणात कांदे-बटाटे विकणार्या एका मुसलमान तरुणाला पोलिसांनी कह्यात घेतले. त्यानंतर हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आंदोलन केले होते.
संपादकीय भूमिका
|