जळगावच्या महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या घरावर आक्रमण !
जळगाव – येथील महानगरपालिकेच्या महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या घरावर अज्ञातांनी ९ सप्टेंबरच्या रात्री आक्रमण केले. (शहराचे प्रथम नागरिकच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) या प्रकरणी एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून ४६ संशयितांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
महापौर सौ. महाजन आणि त्यांचे पती श्री. सुनील महाजन हे दुपारपासून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांचे सासरे आणि मुले घरीच होती. ‘सासरे घरात रुग्णाईत असल्याने मंडळाने वाद्य बंद करून थोडे पुढे जावे’, असे सांगितल्याचा राग आल्याने त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात गुलाल, फटाके, दगड फेकण्यात आले.