महापालिकेने ‘यांत्रिक पद्धतीने विसर्जन’ करणारे यंत्र (रोलर मशीन) हटवल्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून प्रशासनाचे आभार !
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी इराणी खण येथे ‘यांत्रिक पद्धतीने विसर्जन’ (रोलर मशीन) करणारे यंत्र बसवले होते. यात यंत्रावर एका बाजूने मूर्ती ठेवण्यात येत होत्या. त्या सरकत जाऊन पुढे शेवटी खणीत विसर्जित होत होत्या. याला विरोध करत हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी प्रथम पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आणि पत्रकार परिषद घेऊन ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या यांत्रिक पद्धतीची (कन्व्हेअर बेल्ट) व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर कायदेशीर कारवाई करा’, अशी मागणी केली. या संदर्भात सहकार्याची भूमिका घेत महापालिका प्रशासनाने हे यंत्र हटवले आहे. याविषयी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी आभार व्यक्त केले आहेत.