श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून जादा गाड्यांची सोय !
कोल्हापूर, १० सप्टेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने श्री क्षेत्र गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे जाण्यासाठी १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख बसस्थानकांवरून भाविक प्रवाशांच्या गर्दीनुसार अधिक वाहतूक करण्यात येणार आहे, तरी भाविक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.