गोवा : सरकारी कर्मचार्यांच्या कुटुंबियांनीच अवैधरित्या घेतला होता गृहआधार योजनेचा लाभ !
|
पणजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) – सरकारी सेवेत असतांना सामान्य लोकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांचा लाभ घेता येत नाही, हे ठाऊक असूनही काही सरकारी कर्मचार्यांच्या कुटुंबियांनी गृहआधार योजनेचा लाभ घेतला, तसेच काही सरकारी महिला कर्मचार्यांनी याचा गैरलाभ घेतला. अशा सरकारी कर्मचार्यांवर महिला आणि बाल विकास संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत २७ लाख ९१ सहस्र रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले आहेत.
(सौजन्य : Prudent Media Goa)
सरकारी सेवेत असतांना काही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही किंवा एका सेवेचा किंवा योजनेचा लाभ घेत असतांना तशाच प्रकारच्या दुसर्या सेवेचा लाभ घेता येत नाही, हे ठाऊक असूनही काही कर्मचारी लोभापायी स्वतःची खरी माहिती लपवून सरकारी योजनांचा लाभ घेतात किंवा स्वःची पत्नी किंवा कुटुंबीय यांना अशा योजनेचा लाभार्थी बनवतात. काही सरकारी कर्मचार्यांवर अजून कारवाई प्रलंबित आहे. अशी एकूण २ सहस्र ४७६ प्रकरणे असल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय अथवा महामंडळात कार्यरत असणार्या आणि वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांहून अल्प असणार्या सरकारी कर्मचार्याला किंवा त्याच्या पत्नीला ‘गृहआधार’ योजनेचा लाभ घेता येतो. गोव्यात असे केवळ १२० सरकारी कर्मचारी लाभार्थी आहेत.
_________________________________
GRIHA AADHAR SCHEME|Government Of Goa
_____________________
संपादकीय भूमिकासरकारी योजनांचा कुटुंबियांना अवैधरित्या लाभ देणारे सरकारी कर्मचारी समाजद्रोहीच ! |