‘घरवापसी’चा आदर्श निर्माण करणार्या जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) यांचे विचार !
‘पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्या. आता ते राक्षस कट्टरपंथियांच्या रूपात कार्यरत असून आपण त्यांना आतंकवादी म्हणतो. सर्वांत पुरातन अशा सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे; मात्र आम्ही त्यांना हिंदु धर्मात प्रवेशाचा मार्ग दाखवल्यामुळे आज अनेकजण हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेत. ते मिळून मिसळून राहू इच्छितात; मात्र हिंदु धर्मात प्रवेश केल्यावर कट्टरपंथियांपासून छळ होण्याची त्यांना भीती आहे; मात्र ही भीतीही आता न्यून होत आहे. हिंदु धर्मात परत येऊ इच्छिणार्यांचे पूर्वी तलवारीच्या बळावर बलपूर्वक धर्मांतर झाले होते; मात्र ते आता हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे.’