अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पीडितत शेतकर्यांसाठी वाढीव दराने ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य !
मुंबई – महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे एकूण २३ लाख ८१ सहस्र ९२० हेक्टर शेतीची हानी झाली असून २५ लाख ९३ सहस्र शेतकर्यांना अतीवृष्टीचा फटका बसला आहे. या पीडित शेतकर्यांसाठी ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरित करण्यात येणार आहे. आपदग्रस्त शेतकर्यांना संमत केलेले साहाय्य तातडीने वितरित करण्याचा आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांच्या साहाय्य निधीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.