कोल्हापूर-कलबुर्गी नवी रेल्वे धावण्यास सज्ज !
प्रधान मुख्य परिचलन व्यवस्थापक मुकुल जैन यांची कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पहाणी
कोल्हापूर – कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर नवी रेल्वे धावण्यासाठी सज्ज असून, या गाडीचा प्रारंभ कोणत्याही दिवशी होईल, असे मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचलन व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले. या वेळी कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस चालू करण्याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची त्यांनी पहाणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट, तसेच सध्याच्या फलाट विस्तारीकरणाच्या कामाची त्यांनी पहाणी केली. या वेळी पुणे विभागाचे मुख्य परिचलन व्यवस्थापक स्वप्नील नीला, स्थानक प्रबंधक विजय कुमार, करण हुजगे, रवींद्र कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.