नाशिक येथील अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांड प्रकरणी ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा !
नाशिक – जिल्ह्यातील मनमाड येथील अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्याकांड प्रकरणी मालेगाव येथील जिल्हा आणि अप्पर सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पोपट शिंदेसह तिघांना ८ सप्टेंबर या दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपीचा त्या वेळीच जळून मृत्यू झाला होता. यामध्ये एकूण १५ आरोपींचा समावेश होता. उर्वरित काही आरोपींवर मोक्का कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांनी केलेली होती. वर्ष २०११ मध्ये झालेल्या घटनेचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला आहे. (विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे ! – संपादक)
२५ जानेवारी २०११ या दिवशी धाड टाकण्यासाठी गेलेले अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारले होते. यामध्ये एकूण ५ जणांना अटक करण्यात आली होती. यांतील एक आरोपी अल्पवयीन होता.