जिज्ञासूवृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणारे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ !
१. शांत आणि स्थिर
‘सद्गुरु नीलेशदादा अतिशय शांत आणि स्थिर आहेत. त्यांच्याकडे पहाताच शांतीची स्पंदने जाणवतात.
२. जिज्ञासूवृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणे
काही मासांपूर्वी ‘धर्मसंवाद’, या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगासाठी सद्गुरु नीलेशदादा यांचे चित्रीकरण करायचे होते. त्यासंदर्भात मला एका साधकाला साहाय्य करण्याची सेवा मिळाली होती. त्या सत्संगाच्या संहितेमध्ये एक संस्कृत श्लोक होता. संहिता पूर्ण वाचून झाल्यावर सद्गुरु नीलेशदादांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील संस्कृत जाणणार्या एका पुरोहित साधकाशी अनौपचारिक बोलतांना त्याच्याकडून त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ आणि उच्चार समजून घेतला. तेव्हा ‘संतांची जिज्ञासा आणि परिपूर्ण सेवा करण्याची वृत्ती कशी असते ?’, हे मला शिकायला मिळाले.
३. अनुभूती
‘पू. नीलेशदादा सद्गुरुपदी विराजमान झाले असतील’, असा मनात विचार येणे आणि प्रत्यक्षातही ते सद्गुरुपदी विराजमान होणे : जून २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या एका सत्राच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. नीलेशदादा धर्मप्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपिठावर बसले होते. तेव्हा बोलतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून पू. नीलेशदादा यांचा उल्लेख ‘सद्गुरु नीलेशदादा’ असा केला गेला. त्या वेळी ‘पू. नीलेशदादा सद्गुरुपदी विराजमान झाले असणार’, असा एक ठाम विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षातही २९.६.२०२२ या दिवशी पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरु पदावर आरूढ झाल्याचे घोषित करण्यात आले.’
– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२२)
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |