अनंतचतुर्दशीला रायगड, रत्नागिरीला अतीवृष्टीची शक्यता ! – हवामान विभाग

मुंबई – बंगालच्या उपसागरात अल्प दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होऊ लागल्याने अनंतचतुर्दशीला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत अतीवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणांसाठी मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, ८ सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर आणि पुणे येथे ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहील. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊसही पडेल. कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, तसेच नांदेड येथेही असेच वातावरण राहील. ९ सप्टेंबरपासून ३ दिवस पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’, तसेच रत्नागिरीत अतीवृष्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.