श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?
#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh
गणेशोत्सव २०२२
‘भारत दारिद्र्यात असतांना फटाक्यांच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपये जाळणारे देशद्रोहीच होत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदूंनो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !‘सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचसमवेत आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत. अशा परिस्थितीत ‘फटाके फोडणे गणपतीला आवडेल कि त्याचा नामजप केलेला आवडेल ?’ याचा विचार करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. गौरी विसर्जनाच्या वेळी श्री गणपति विसर्जन करायचे असतांना त्या दिवशी कोणताही वार किंवा कितवाही दिवस असला, तरी त्या दिवशी विसर्जन करता येते.
२. घरात गर्भवती स्त्री असतांना श्री गणपति विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे.
३. गणपतीपूजन १० दिवस करणे शक्य नसेल, तर पूजनाचे दिवस न्यून करून दीड दिवस, पाच किंवा सात दिवस गणपतिपूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करता येईल.
(साभार : २१ व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म, प्रकाशक – श्री. अनंत (मोहन) धुंडीराज दाते)
श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात का करू नये ?
‘प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जना’च्या नावाखाली काही महापालिकांकडून ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधण्यात आले आहेत. तसेच हिंदूंनी भावपूर्ण पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे या हौद अथवा कुंड यांमध्ये दान करा, असे धर्मविसंगत आवाहन करण्यात आले आहे.
अशा हौदांत गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे. याची धर्मशास्त्रीय कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. ‘प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे असे शास्त्र आहे. वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे पूजेमुळे मूर्तीत आलेले चैतन्य पाण्यातून सर्वदूर पोचते. हौदातील पाणी वहाते नसल्यामुळे या आध्यात्मिक लाभापासून भाविक वंचित होतात.
२. हौदात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पालिकेचे कर्मचारी गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यापूर्वीच ती हौदातून काढून बाहेर ठेवतात. असे करणे शास्त्राच्या विरोधात आहे.
३. हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती पालिकेच्या कचर्याच्या गाडीतून नेल्या जातात. तसेच पालिकेचे कर्मचारी मूर्ती कचर्याप्रमाणे फेकतात. बर्याच वेळा या मूर्ती खाणीतील घाण पाण्यात फेकण्यात येतात, असे अनेक वेळा समोर आले आहे.
४. गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पालिका हौद बुजवण्यापूर्वी त्यातील गणेशतत्त्वाने भारित झालेले पाणी गटारात सोडून देते. हीसुद्धा श्री गणेशाची विटंबनाच आहे.