लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील मूर्तींची तौफीककडून तोडफोड
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील टीले वाली मशिदीजवळील ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील २ मूर्तींची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तौफीक याला अटक केली आहे. सध्या येथे पोलिसांनी बंदोबेस्त ठेवला आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेविषयी स्थानिक आमदार नीरज बोरा यांनी म्हटले की, यामागे दंगल घडवण्याचा हेतू असू शकतो.
मंदिराच्या पुजार्यांच्या म्हणण्यानुसार शनिदेव आणि श्री हनुमान अशा २ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. येथे मंगल महोत्सव चालू असतांना एक व्यक्ती मंदिरात आली आणि तिने ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत मूर्तींची तोडफोड केली. या वेळी मंदिरात उपस्थित भाविकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. त्याचे नाव तौफीक असल्याचे त्याने सांगितले. (मूर्ती तोडतांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन ‘मूर्ती तोडणारा हिंदूच आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न तौफिककडून करण्यात आला, हे लक्षात घ्या ! – संपादक)
Uttar Pradesh | A person vandalised two idols at hanuman temple in Lucknow. He was arrested immediately. Police interrogated the accused. Medical examination showed he was drunk. Stringent action has been initiated against him: S Channappa, DCP West, Lucknow pic.twitter.com/Pvfqq4ghSL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 8, 2022
संपादकीय भूमिका
|