साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सोलापूर, ८ सप्टेंबर (वार्ता.) – अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्यांवरील उपायांविषयी हिंदूंना कुठेही दिशा दिली जात नाही. याचा परिणाम हिंदूंच्या व्यावहारिक, कौटुंबिक आणि धार्मिक गोष्टींवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
येथील ‘सोनी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळा’ने धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांना मार्गदर्शन लाभावे, यासाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांना आमंत्रित केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर हेही उपस्थित होते. सोनी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळामध्ये यंदाच्या वर्षी प्रथमच युवक आणि युवती यांनी पुढाकार घेऊन ‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करत आहेत. यामध्ये नामजप करणे, भजन म्हणणे, पारंपरिक कार्यक्रम करणे, अशा पद्धतीने मंडळ कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
क्षणचित्रे
१. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित महिलांनी सत्संग चालू करण्याची मागणी केली, तसेच ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध विधी कसे करावेत ?’ याविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यास सांगितले.
२. या वेळी मंडळाच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.