दान केलेल्या गणेशमूर्ती पुण्यातील सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडून शाळेतील वर्गात ठेवण्यात आल्या !
शिक्षक आणि विद्यार्थी यांची पुष्कळ गैरसोय !
वडगाव बुद्रुक (जिल्हा पुणे) – हौदात विसर्जित केलेल्या, तसेच मूर्तीदान केलेल्या गणेशमूर्ती सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडून वडगाव बुद्रुक येथील पुणे मनपा शिक्षण विभाग संचालित शाळेच्या वर्गामध्ये ठेवण्यात आल्याने मुलांना बसण्यासाठी जागा राहिली नाही. वर्गासह ओट्यावरही मूर्ती ठेवण्यात आल्याने शिक्षकांना उभे रहाण्यासही जागा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रोहिणी जाधव यांनी सांगितले की, पुणे मनपा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने वडगाव भागातील श्री गणेशमूर्ती विसर्जन, मूर्तीदान याविषयीच्या ठिकाणांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये या शाळेचे नाव कुठेही नाही. प्रतिवर्षी क्षेत्रीय कार्यालयाकडून शाळेतील वर्गांत अशा मूर्ती आणून ठेवल्या जातात. (याचा अर्थ अशा प्रकारे केवळ याच वर्षी नव्हे, तर प्रतिवर्षी श्री गणेशमूर्ती शाळांमध्ये ठेवण्यात येऊन हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या जात आहेत ! – संपादक)
शाळेच्या वर्गात ठेवल्या विसर्जित मूर्ती ! पुण्यातील सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार; विद्यार्थ्यांना बसण्यास जागाच नाही https://t.co/vO4jv2UYMk
— भारत लाइव्ह मीडिया (@BLaevh) September 7, 2022
आम्हाला गणपति उचलणे, तसेच जागेची स्वच्छता करावी लागते. या कामामुळे शाळेला सुटी द्यावी लागते. या वर्षी मूर्ती ठेवण्यासाठी शाळा उपलब्ध नसल्याविषयी आम्ही सहआयुक्त प्रदीप आव्हाड यांना पत्र दिले होते; परंतु कर्मचार्यांनी दुर्लक्ष करत वर्गामध्ये गणेशमूर्ती आणून ठेवल्या आहेत.
यावर विसर्जित, तसेच दान करण्यात आलेल्या ज्या मूर्ती ठेवल्या आहेत, त्या तातडीने इतरत्र नेण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्याचे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त प्रदीप आव्हाड यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|