इस्लामच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू !
इस्लामी देशांची नेटफ्लिक्स अॅपला चेतावणी !
रियाध (सौदी अरेबिया) – ‘नेटफ्लिक्स’ या अॅपवर इस्लामच्या विरोधात असणारी माहिती प्रसारित करणे बंद करावे अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी ‘गल्फ कोऑपरेशन’ देशांमध्ये सहभागी असलेल्या देशांकडून अधिकृत निवेदन काढून देण्यात आली आहे. या देशांमध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बहरीन, कुवैत, ओमान आणि कतर यांचा समावेश आहे. या प्रकरणी नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
The Arab nations have decried Netflix for showing content related to same-sex relationships on its streaming platformhttps://t.co/CJUcOm15fJ
— WION (@WIONews) September 7, 2022
१. वर्ष २०२२ मध्ये ‘डिझ्नी’ आणि ‘हॉटस्टार’ यांच्या ‘लाइटईयर’ मालिकेच्या प्रसारणावरही बंदी घालण्यात आली होती. यामध्ये दोघा समलैंगिकांना चुंबन घेतांना दाखवण्यात आले होते. इस्लामी देशांमध्ये समलैंगिक संबंध हा गुन्हा आहे.
२. वर्ष २०१९ मध्ये ‘नेटफ्लिक्स’वरील एका मालिकेमध्ये सौदी अरेबिया सरकारवर टीका करण्यात आल्यानंतर या मालिकाचे प्रक्षेपण रोखण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू’, असे भारत सरकार कधी सांगणार ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! |