धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विद्यार्थिनीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात
नवी देहली – देहली पोलिसांनी नुकतेच आस महंमद नावाच्या मुसलमान तरुणाला सामाजिक माध्यमावरील बनावट खात्याच्या माध्यमातून हिंदु मुलीला अपकीर्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली. पीडित मुलीने ‘आस महंमद माझा पाठलाग करतो’, असा आरोप केला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार महंमद याने देहलीतील १२ वीच्या विद्यार्थिनीशी सामाजिक माध्यमावरून मैत्री केली. या वेळी त्याने ‘मी सैन्यात असून माझे नाव ‘आसू राणा’ आहे’, असे सांगितले. यानंतर पीडित मुलगी आणि महंमद यांच्यात सामाजिक माध्यमावरून संभाषण चालू झाले. महंमद याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आरोपी मुसलमान असल्याचे सत्य समोर आल्यावर पीडित मुलीने मैत्री तोडली. पीडित मुलीने संपर्क करणे थांबवल्यानंतर महंमद याने तिला अपकीर्त करण्यासाठी सामाजिक माध्यमावर अनेक बनावट खाती सिद्ध केली. या खात्यांच्या माध्यमातून पीडित मुलगी आणि तिचे मित्र यांना अश्लील छायाचित्रे पाठवण्यास चालू केले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.