बनावट पनीर तयार करणार्या कारखान्यावर कारवाई !
मांजरी खुर्द (हवेली) (पुणे) – येथील आर्.एस्. डेअरी फार्म या विनाअनुमती व्यवसाय करणार्या आस्थापनावर धाड टाकल्यावर तेथे बनावट पनीर बनवत असल्याचे आढळून आले. या आस्थापनातून १ लाख ९७ सहस्र रुपये किमतीचे ८९९ किलो बनावट पनीर शासनाधीन केले आहे, तर पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी २ लाख १९ सहस्र रुपये किमतीची ५४९ किलो स्कीम मिल्क पावडर आणि २८ किलो आर्.बी.डी. पामोलीन तेल असा एकूण ४ लाख २१ सहस्र रुपयांचा साठा शासनाधीन केला आहे. सण-उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून अन्नपदार्थांची विक्री होण्याची शक्यता असल्याने अशा काही गोष्टी निदर्शनास आल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या ‘टोल फ्री’ (विनामूल्य संपर्क करण्याचा क्रमांक) क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागीय सहआयुक्त संजय नारगुडे यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकानागरिकांच्या जिवाशी खेळणार्या आस्थापनांवर तातडीने कारवाई करून ते बंदच करायला हवेत ! |