‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव-दाभाडे’ आणि ‘इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव-दाभाडे’ यांच्या वतीने श्री गणेशमूर्तीदान आणि निर्माल्य दान उपक्रम !
तळेगाव-दाभाडे (जिल्हा पुणे) – येथील ७ दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव-दाभाडे’ आणि ‘इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव-दाभाडे’ यांच्या वतीने श्री गणेशमूर्तीदान आणि निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला. तळेगावमधील मारुति मंदिर चौकात मूर्ती संकलन आणि निर्माल्य संकलन करण्यात आले. या वेळी तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तसेच दोन्ही क्लबचे सदस्य उपस्थित होते. दोन्ही क्लबच्या माध्यमातून या सर्व मूर्तीचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंचा कोणताही सण, उत्सव आला की, धर्मद्रोही आणि संभ्रम निर्माण करणार्या संस्था या हिंदूंच्या मनात, गणेशभक्तांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वातावरण सिद्ध करतात. हिंदु धर्मात अनेक साधू, संत, महात्मे आहेत. त्यांनी मूर्तीदान करण्याविषयी कोठेही सांगितलेले नाही. वहात्या पाण्यात विसर्जन करणे हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. गणेशभक्तांनो, संभ्रमित न होता १० दिवस विधीवत् पूजा केलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यातच करा ! |