श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन !

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन

अमरावती, ७ सप्टेंबर (वार्ता) – जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्वर जगदगुरु स्वामी राम राजेश्वराचार्यजी, समर्थ माऊली सरकार यांनी अमरावती येथे गणेशोत्सवानिमित्त चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना, गणेश महायाग, तसेच भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा असे आयोजन केले होते.

या संत संमेलनात देशभरातून विविध संत महंत सहभागी झाले आहेत. स्वतः स्वामीजींनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे ते व्यासपिठावर उपस्थित होते. सकाळी निघालेल्या शोभायात्रेचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुष्पवृष्टी आणि शंखनाद करून स्वागत करण्यात आले.