श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर – शहरातील इराणी खण येथे एका स्वयंचलित यंत्राद्वारे घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. या स्वयंचलित यंत्रामध्ये एक फिरणारा पट्टा असून त्यावर एका बाजूने श्री गणेशमूर्ती ठेवण्यात येत असून त्या पट्ट्यावरून मूर्ती सरकत जाऊन पुढे खणीत विसर्जित होतात. असे करणे हे पूर्णत: धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. याच समवेत महापालिकेने भाविकांकडून घेतलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खण येथे फेकून देतांनाचा ‘व्हिडिओ’ समोर आला असून भाविकांच्या धर्मभावनांचा हा अपमान आहे. तरी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ७ सप्टेंबर या दिवशी पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
सौजन्य : ingoanews
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. न्यायालय, हरित लवाद अथवा शासन यांनी भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नसतांना कोल्हापूर महापालिका प्रशासन हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणत भाविकांना पंचगंगा नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी आणून इराणी खण, तसेच ठिकठिकाणी विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडत आहे.
२. श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना ती ३ वेळा पाण्यात बुडवून विसर्जित करण्याचे प्रथा आहे. तसेच विसर्जित केलेल्या ठिकाणची काही माती घरी घेऊन येऊन त्याची पूजा करतात; मात्र ‘रोलर’चा उपयोग केल्याने भाविकांना या कृतीपासून वंचित रहावे लागते. असे करून प्रशासन हिंदूंच्या धार्मिक कृतींवर गदा आणण्याचे काम करत आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन हा पूर्णत: धार्मिक विषय असल्याने असे करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, जाणकार यांच्याशी चर्चा केली होती का ?
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. हिंदु धर्मशास्त्रात कोणत्याही प्रकारचा आधार नसणार्या आणि लाखो रुपये खर्च करून सिद्ध केलेली स्वयंचलित यंत्रे बसवणार्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२. भाविकांनी श्रद्धेने दान म्हणून दिलेल्या, तसेच कुंडात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत फेकणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. यापुढील उर्वरित दिवसांमध्ये गणेशमंडळांना, तसेच गणेशभक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्यास आठकाडी आणू नये.
गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोल्हापुरात स्वयंचलित यंत्र बसवण्यात आलं आहे. मात्र, यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.#kolhapur @NiteshNRane https://t.co/LddruyiDn6
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
संपादकीय भूमिकाहिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक ! |