कोल्हापूर महापालिकेच्या कृतीमुळे हिंदूंच्या देवतेचा अवमान ! – नितेश राणे, आमदार, भाजप
कोल्हापूर महापालिकेने इराणी खणीत श्री गणेशमूर्ती पाण्यात फेकून विसर्जित केल्याचे प्रकरण !
मुंबई – कोल्हापूर महापालिका प्रशासनाने श्री गणेश विसर्जनासाठी जी पद्धत चालू केलेली आहे, त्यामुळे आमच्या देवतेचा अवमान होत आहे. हिंदु संस्कृतीप्रमाणे विसर्जन करता येत नाही का ? अशा प्रकारची पद्धत आम्ही कधीही खपवून घेणार नाही, हे कोल्हापूर प्रशासनाने लक्षात घ्यावे आणि हे तातडीने बंद करावे, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे ट्ीवटद्वारे केली आहे.
गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोल्हापुरात स्वयंचलित यंत्र बसवण्यात आलं आहे. मात्र, यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.#kolhapur @NiteshNRane https://t.co/LddruyiDn6
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
१. कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
२. या खाणीत नवीन बसवलेल्या यंत्राच्या पट्ट्यांद्वारेही गणेमूर्ती खाडीत सोडल्या जात आहेत आणि शेजारी काही कर्मचार्यांकडून त्या अक्षरशः फेकल्या जात आहेत, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
३. त्यांच्या ट्वीटला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यंनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, ‘श्री गणपति ही हिंदूंची देवता आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली भक्तांकडून श्री गणेशमूर्ती गोळा करून त्या पाण्यात फेकून देणार्यांवर गुन्हा नोंदवला पाहिजे.’
संपादकीय भूमिकाहिंदुद्रोही महापालिका प्रशासन ! |