ब्रिटनमध्ये पाकिस्तानी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण होत असल्याचा व्हिडिओ प्रसारित  

लिसेस्टर (ब्रिटन) – येथे मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमणे केली जात असल्याचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. यात मुसलमान जमाव हिंदूंच्या घरांना लक्ष्य करतांना त्यांच्या हातात शस्त्रे दिसत आहेत. ते हिंदूंना शिवीगाळ करत आहेत. या वेळी पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना कुणी रोखत नसल्याचेही दिसत आहे. दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून हिंदूच हिंदूंवर आक्रमणे करत असल्याचे आरोप होत आहेत. सामाजिक माध्यमांतून काही जणांचे म्हणणे आहे, ‘हे पूर्वनियोजित आक्रमण आहे. पूर्ण सिद्धतेने मुसलमान आक्रमण करत आहेत.’ या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम चालू केली आहे आणि हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई करत आहेत.

१. या व्हिडिओमध्ये हिंदूंना मारहाण, हिंदूंच्या घरांची तोडफोड, घराबाहेरी भगवा झेंडा काढून फेकून दिल्याचेही दिसत आहे. या घटनांकडे ब्रिटनमधील प्रसारमाध्यमेही दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अशा घटनांचे वृत्त ते प्रसारित करण्याचे टाळत असल्याचे सांगितले जात आहे.

२. ‘इ इंडिपेंडेंट’ या दैनिकाचे हिंदुद्वेषी पत्रकार सनी हुंडल यांनी ३० ऑगस्ट या दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात काही जण ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देतांना दिसत होते. त्यांनी लिहिले होते की, लिसेस्टरमध्ये हिंदुत्वनिष्ठ कट्टरतावादी रस्त्यावर येऊन हिंसाचार करत आहेत. ही त्रस्त करणारी घटना आहे. (हिंदू जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी ते सहिष्णु असतात; मात्र त्यांच्यावर कुणी अत्याचार केले किंवा त्यांना लक्ष्य केले, तर त्यांनी प्रतिकार करायचा नाही का ? जागतिक स्तरावर हिंदूंना कशा प्रकारे अपकीर्त केले जात आहे, याचे हे उदाहरण होय ! – संपादक)

३. याच व्हिडिओला आणि ट्वीटला हिंदूंवरील आक्रमणाचे कारण म्हटले जात आहे. सनी हुंडल नेहमीच भारतियांना आणि हिंदूंना लक्ष्य करत असतात. त्यांच्यामुळेच ब्रिटनमधील पाकिस्तानी मुसलमान हिंदूंना लक्ष्य करत आहेत. (अशा हिंदुद्वेषी पत्रकारावर पोलीस काय कारवाई करणार ? – संपादक)

४. या हिंसाचारामागे क्रिकेटचा सामना असल्याचे सांगितले जात आहे. २८ ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सामना होता. यात भारताचा विजय झाल्यावर बेलग्रेव मार्गावर विजय साजरा करतांना भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला. त्या वेळी भारतियांना वाटले की, अवमान करणारे पाकिस्तानी आहेत आणि मग त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर पाक आणि भारतीय यांच्यात वाद झाला.

संपादकीय भूमिका

  • ब्रिटनमधील भारतीय वंशाचे राजकारणी ऋषी सुनक यांनी याची नोंद घेऊन हिंदूंच्या रक्षणासाठी आणि धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
  • अशा घटनांत भारत सरकारनेही हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !