पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन करत आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार
जम्मू – पाकिस्तानच्या सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन करत येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलाने सडेतोड उत्तर दिले. या गोळीबारानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांकडून ध्वज बैठक आयोजित करून युद्धबंदी कराराचे पालन करण्यावर संमती झाली. २० फेब्रुवारी २०२१ या दिवशी पाकिस्तान सीमेवर युद्धबंदीसाठी सिद्ध झाला होता. यानंतर एखाद-दुसरी घटना वगळता शांतता राहिली आहे. (सीमेवर शांतता असतली, तरी काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून पुन्हा हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत, हेही तितकेच खरे ! – संपादक)
The BSF gave a “befitting reply” to the firing in the Arnia sector of Jammu district, he said.#BSF #Pakistan https://t.co/KwNwYBg5aA
— IndiaToday (@IndiaToday) September 6, 2022
संपादकीय भूमिकापाक विश्वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक ! |