देहलीतील गोविंदपुरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आणि ठाणा प्रमुख यांच्यात हाणामारी !
नवी देहली – दक्षिण पूर्व देहलीतील गोविंदपुरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आणि ठाणा प्रमुख यांच्यात जोरदार भांडण झाले. या वेळी झालेल्या हाणामारीत ठाणा प्रमुख जगदीश आणि उपनिरीक्षक महेश चंद घायाळ झाले. दोघांवरही ‘एम्स’मध्ये उपचार चालू आहे. या घटनेनंतर उपनिरीक्षक महेश चंद यांना निलंबित करण्यात आले आहे.
दिल्ली का एक थाना देखते ही देखते जंग का मैदान बन गया #Delhi @NeerajGaur_ https://t.co/Uf52dJRYub
— Zee News Crime (@ZeeNewsCrime) September 7, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रकरणात उपनिरीक्षक महेश चंद यांना उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात येणार्या ‘स्टेटस रिपोर्ट’वर (एखाद्या कामकाजाविषयी सद्यःस्थितीचे वर्णन करणार्या कागदपत्रांवर) ठाणा प्रमुखांची स्वाक्षरी हवी होती; परंतु ठाणा प्रमुखांना या ‘स्टेटस रिपोर्ट’मध्ये काही विसंगती आढळून आल्या. त्यांनी त्या दुरुस्त करण्यास चालू केल्यावर महेश चंद यांना राग आला. ‘हा ‘स्टेटस रिपोर्ट’ स्थायी समितीने बघितला आहे आणि ठाणा प्रमुख वेळ वाया घालवत आहे’, असे महेश चंद म्हणाले. यावरून दोघांमध्ये भांडण चालू झाले. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे पाहून अन्य पोलिसांनी हस्तक्षेप केला. ठाणा प्रमुखांच्या हाताला दुखापत झाली, तर उपनिरीक्षक महेश हेही घायाळ झाले.
संपादकीय भूमिकाआपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? |