श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यात अन् स्वतःत शिवतत्त्वाची अनुभूती घेणारे पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर !
‘१८.५.२०२२ या दिवशी पू. वामन राजंदेकर यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी संध्याकाळी भेट झाली.
१. पू. वामन म्हणाले, ‘‘सद्गुरु मावशी आणि सद्गुरु काकू शिवरूपात असून त्या शिवदशेत आहेत’, असे मला जाणवले. (पू. वामन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘सद्गुरु मावशी’ म्हणतात आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘सद्गुरु काकू’ म्हणतात.)
२. त्यांच्या समवेत असतांना माझा ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप चालू होता.
३. मला थंडावा जाणवत होता.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्यात आणि माझ्यातही शिवबाप्पाच (शिवतत्त्व) आहे.’’
– सौ. मानसी राजंदेकर, फोंडा, गोवा. (१८.५.२०२२)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी विचारल्यावर ‘देव माझा मित्र आहे !’, असे सांगणारे पू. वामन राजंदेकर !
‘एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. वामन यांना विचारले, ‘‘वामन ! तुझा मित्र कोण आहे ?’’ तेव्हा पू. वामन काही बोलले नाहीत. दुसर्या दिवशी ते मला म्हणाले, ‘‘आई सद्गुरु मावशींनी विचारले होते ना, ‘माझा मित्र कोण आहे ?’, तर देव म्हणजेच माझा मित्र !’’
– सौ. मानसी राजंदेकर फोंडा, गोवा. (३.३.२०२२)