‘सेंद्रिय शेती’ ही पाश्चात्त्य, तर ‘नैसर्गिक शेती’ ही भारतीय !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘रासायनिक शेतीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यावर पाश्चात्त्य देशांमध्ये सेंद्रिय शेती चालू झाली. या पद्धतीमध्ये ‘कंपोस्ट’ खत (विघटनशील कचरा खड्ड्यात कुजवून बनवलेले खत), गांडूळ खत, ‘बोनमील (प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेले खत)’ अशी खते वापरली जातात. ही बनवण्यासाठी विदेशी गांडुळांचा उपयोग केला जातो. त्यांच्या विष्ठेत ‘आर्सेनिक’, शिसे अशा विषारी धातूंचे अंश असतात. महाग असलेली ही खते बहुतेक वेळा विकत आणावी लागतात. त्यामुळे शेतीवरील व्यय पुष्कळ वाढतो. आपत्कालीन परिस्थितीत बाहेरून खते उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात. याउलट ‘नैसर्गिक शेती’ पूर्णतः स्वावलंबी असून आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही अत्यंत उपयुक्त आहे.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा.