ट्रॅकमन्समुळे रेल्वेचा अपघात टळला
मुंबई – कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी) प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्या वेळी इंद्रायणी एक्सप्रेस वेगाने येत होती. ट्रॅकमन्सच्या सतर्कतेमुळे ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी रेल्वेचा मोठा अपघात टळला. या नंतर या मार्गावरील लोकलगाड्यांची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास रूळ दुरुस्त करण्यात आला.