तोकड्या कपड्यांत दर्शनासाठी आलेल्या गायिकेला पूर्ण कपडे परिधान केल्यावर दर्शनाची अनुमती !
अंधेरी (मुंबई ) – येथील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या ‘अंधेरीचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी भारतीय-अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मिश्रा आल्या होत्या. या वेळी त्यांनी तोकडे कपडे परिधान केले होते. तोकडे कपडे घालून येणार्या गणेशभक्तांना येथे दर्शन घेण्यास प्रतिबंध आहे. या वेळी लिसा मिश्रा यांना लुंगी देण्यात आली. लुंगी अंगाभोवती घेऊन त्यानंतर त्यांनी दर्शन घेतले.
‘कुणी गणेशभक्त तोकडे कपडे घालून आल्यास त्यांना कपडे परिधान करण्यास दिले जातात आणि ते परिधान करून दर्शन घेतात’, अशी माहिती ‘आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’चे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
संपादकीय भूमिकागणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्याविषयी जागृत असलेल्या ‘आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’चे अभिनंदन ! |