हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींकडून ओणम् साजरा केला जात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून होत आहे प्रसारित !
मलप्पूरम् (केरळ) – मलप्पूरम्च्या वंदूर गव्हर्न्मेंट गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधील एक व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) परिधान केलेल्या विद्यार्थिनी ओणम्चा सण साजरा करत असल्याचे दिसत आहे. याव्हिडिओची सत्यता मात्र स्पष्ट झालेली नाही. ‘या विद्यार्थिनी खरेच मुसलमान आहेत का ?’, हेही स्पष्ट झालेले नाही.
A short video clip of hijab-wearing students dancing during Onam celebrations at a high school in Kerala’s Wandoor has gone viral on social media.https://t.co/mW2wKH1y1f
— Economic Times (@EconomicTimes) September 5, 2022
संपादकीय भूमिकामुसलमानांनी हिंदूंच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर किंवा हिंदूंनी मुसलमानांच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमे देण्यासाठी पुष्कळच उत्साही असतात; मात्र जेव्हा हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमणे केली जातात, मुसलमानांकडून हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण केले जाते, तेव्हा मात्र ही प्रसारमाध्यमे या बातम्या टाळतात किंवा ‘दोन गटांत हिंसाचार’ असे सांगून सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात ! |